Saturday, 20 September 2014

प्रयत्न


तसा रविवारचा दिवस म्हणजे एक निवांतपणा घेवून येणारा दिवस. अगदी सकाळी उठण्यापासून ते दुपारचे जेवण असो वा रात्रीचे जेवण. एकंदरीतच मनात देहात आळस भरलेला असतो खरा तरी देखील त्यातूनही काही कामं करण्यासाठी वेळ हा काढलाच जातो.
अश्याच काही अनिच्छेने मला आई रविवारी तिच्यासोबत काही कामा निम्मित घेवून गेली. सहजच रविवारी फलटण चा बाजार असल्या कारणाने सर्व स्तरातील लोकांचे दर्शन घडते हे मात्र खरे. तसे लोकांचे निरीक्षण करणे हा माझ्या मते तरी एक प्रकारचा गुन्हा आहेच तरीदेखील समोरच्या व्यक्ती कडून काही शिकायला मिळते का म्हणत मी हा गुन्हा नेहमी करतोच. आई मेडिकल मध्ये तिची औषध घेत होती मी आपला नेहमी प्रमाणे गाडी वर बसून होतो.
तेवढ्यात तो तिथे आला. दाढी तशी वाढलेलीच. पायात एक साधी स्लीपर. एकंदरीतच त्याच्याकडे बघून तो सामोरे जात असलेल्या अठरा विश्व दारिद्र्याची कल्पना आली. सायकल वरून जात असताना अचानक तो थांबला. मला कळलेच नाही अचानक असा तो का थांबला ते. खाली उतरून तो काही तरी शोधू लागला आणि मग माझ्या लक्षात  आले कि त्याच्या सायकल चा पेडल  तुटला आहे. मी सहज म्हणून त्या कडे एक निरीक्षण टाकले. तो पेडल काहीहि झाले तरी दुरुस्त होणार नाही अश्या रीतीने तुटला होता. तरीदेखील त्याची तो पेडल बसवण्याची चालू असलेली धडपड मला बरेच काही शिकवून गेली. एकंदरीतच काय तो हार मानायला तयार नव्हता. बरेच प्रयत्न करून देखील यश मिळत नाही म्हटल्यावर देखील त्याने तो पेडल बरोबर घेतला. आणि तश्याच अवस्थेत सायकल घेवून त्याच्या वाटेवर मार्गक्रमण करू लागला.  साहजिकच त्याच्या लक्षात आले कि मी त्याच्या कडे बघत आहे. कोणतीही कसलीही लाज न बाळगता तो माझ्याकडे बघून इतका सुंदर हसला कि मला त्याचे खूप कौतुक वाटले.
            प्रसंग तसा अगदी ३ ते ४ मिनिटांचाच तरी देखील तो माझ्यासाठी खूप काही शिकवून गेला. सायकलचा पेडल तुटणे हे त्याचा साठी तसे एक प्रकारचे छोटेसे का होईना संकट होतेच म्हणायचं. तरीदेखील तो शांतपणे चीड चीड न करता त्याला सामोरे गेला. पेडल बसवण्यासाठी त्याची चालेली धडपड म्हणेज आलेल्या संकटाला तोडन देण्यासाठी त्याने केलेलं प्रयत्न. आणि खूप प्रयत्न करून देखील यश मिळत नाही म्हटल्या वर त्याने तो पेडल टाकून न देता बरोबर घेवून जाणेच स्वीकारले. एकंदरीतच काय मी हार मानायला तयार नाही, आत्ता माझ्या प्रयत्नांना यश मिळत नाही म्हणून काय झाले मी माझे प्रयत्न बंद करणार नाही.  जाताना त्याने दिलेले एक स्मितहास्य पाहून मला खूप छान वाटले. काहीही झाले तरी त्याला त्याची लाज वाटली नाही उलट ताठ मानेने केलेल्या प्रयत्नांची त्याला जाणीव होती आणि त्यामुळेच तो आनंदी होता. खूप सुंदर असा तो अनुभव होता. ३ ते ४ मिनिटांच्या वेळे मध्ये तो मित्र मला बरेच काही शिकवून गेला. सुंदर असा हा अनुभव आपल्या सर्वांबरोबर शेअर करू वाटला. त्याला यश मिळाले असेल नसेल हा पुढचा प्रश्न पण त्याने केलेल्या प्रयत्नांना, संकटाला सामोरे जाण्याच्या त्याच्या वाटेला आणि यश मिळाले नाही म्हणून प्रयत्न सोडून न देण्याच्या त्याच्या वृत्ती ला मनाचा सलाम

क्षितीज
२० सप्टेंबर २०१४

Monday, 20 May 2013

कोमेजलेलं बालपण


"काय जेवलास रे ? " एकदम साधा सरळ आणि सोपा प्रश्न होता. तसा नेहमीच्या दैनंदिन जीवनात सहज चौकशी करण्या साठी वापरण्यात येणाऱ्या काही प्रश्नान पैकी हा एक प्रश्न. नेहमी विचारतो मी सर्वाना. मग फोन वर असू दे किवा प्रत्यक्ष भेट झाली  तरी. त्याला हि नेहमी प्रमाणे विचारले "काय जेवलास रे"? त्या वर तो दोन मिनिटे शांत मला काही उमजेना म्हणून परत विचारले "अरे ऐकले नाही का? काय जेवलास तू ?" कोणत्या विचारत तो होता काय माहित. मी विचारलेल्या त्याच प्रश्नाने त्याला कदाचित जाग आली. "हा मी ना  मी ते ते छोले असता ना  ते आणि भात खाल्ला". मनुष्याचा चेहेरा त्याच्या मनाचे उत्तम प्रतिबिंब असतो. त्याच्या मनातील एकंदरीत भाव त्याच्या चेहेऱ्या वरून स्पष्ट दिसत होते. आणि पुन्हा मला त्याच  निराशेने घेरले. त्याचा तो केविलवाणा चेहेरा पाहून मलाच कसंतरी झाले. राहवले नाही म्हणून मी सहज विषयाला हात घातला "काय रे हे जे काही तू आत्ता खाल्लं ते तुला आवडलं का? भरलं का पोट तुझे ?" या वर तो पुन्हा दोन मिनिटे निर्रुतर. उगाच मला काही तरी वाटेल मी काही तरी वेगळा विचार करेन म्हणून तो एकदम खात्रीशीर बोलला "हो मग आवडले ना रे दादा". चेहेरा सर्व काही बोलत होता उगाच जास्त प्रश्न विचारून तो गांगरून जाईल म्हणून मी काही बोललो नाही.
                            वय वर्ष १४. अगदी वाढत्या वयाला झालेली सुरुवात. नुकतेच फुटलेल मिसरूड. वाढत्या वयातील भूक आपण सर्व जाणतोच. त्याचा चेहेरा काही वेगळेच बोलत होता.  दादा नकोय मला हे सर्व आता असह्य्य झालंय रे. अनाथ म्हणून मिळालेला शाप आणि उगाच दुसर्यांकडून चांगुलपणा दाखवण्या साठी मिळालेली सहानभूती नकोय रे हे सर्व. घेवून चल मला तुझ्या सोबत. जगू दे मलाहि तुझ्या सारखंच स्वच्छंदी. कोणतीच सीमा कोणतीच मर्यादा नकोय मला. जे मनात येईल ते करायचं आहे. शाळा अभ्यास मित्र हे सर्व आहे रे  पण त्या पलीकडे हि शाळेतून घरी आले कि लाडाने माया करणारी, मायेच्या पदराआड घेवून छान  कुरुवाळनारी, लाडू देणारी, माझा अभ्यास घेणारी आई देशील का रे?  खेळत असताना बाबा आले आहेत रे चल पटकन म्हणून हाक मारणारी आई कुठे मिळेल रे??  घरी पळत येताना आज बाबा काही तरी घेवून आले असतील असे कधी वाटेल का रे मला? वडिलांचा तो दरारा तो राग आणि थोडा मार मग परत मार दिला म्हणून झोपेतच साश्रू नयनांनी पायाला तेल लावणारे आई बाबा मिळतील का रे मला?? मलाही आई सोबत बाहेर जायचंय तिच्या सोबत गप्पा मारायच्या आहेत. काय करू रे मी सांग ना दादा काय करू रे? मी काय अपराध केला म्हणून मला हि शिक्षा.  त्याच्या ह्या चेहेर्या वरच्या प्रश्नांनी मी निरुत्तर होत होतो. आमचा हा मूक संवाद बराच वेळ चालू होता. तो प्रश्ना मागून प्रश्न विचारात होता आणि मी फक्त निर्रुतर शून्य नजरेने त्याच्या कडे बघत होतो.
         बरेच दिवस न मिळालेला वेळ, अक्षयतृतीयेला नील चे ह्या विश्वात झालेले आगमन ह्या कारणांनी मी तिथे गेलो. त्या दिवशी मुले बाहेर गेली आहेत फार थोडी मुले आहेत असे कळले. तरी देखील आमच्या विनंतीला मान देत व्यवस्थापकांनी मुलांना भेटण्यास मुभा दिली. ते तिघेच होते. त्यातील दोघे तर अगदीच पिटुकले एक ४थी मध्ये तर एक ५वी मध्ये. जो सर्वात मोठा होता त्याच्याशीच हा सवांद झाला. उन्हाळ्याच्या सुट्टीचे दिवस, मामाचे गाव, तिथे केलेली धमाल, आंबे चिंचा हे सर्व आठवले. कोण ह्या मुलांचा मामा? कसला मामा न कसला काय जन्माला आल्या पासून अनाथ हा शाप घेवून आला दिवस पुढे ढकलत ह्यांचे बालपण पुरे कोमेजून गेले.
कसला असेल तो भात आणि ती छोले ची भाजी त्या मध्ये काही सत्व असेल का ? गरमा गरम मेतकुट आणि मस्त तूप वाढणारी आई ह्या मुलांना कोण देईल का? आई चे महत्व काय हे मला तिथे जावून जरा जास्तच कळले. अगदी मागच्याच वेळेची गोष्ट खेळता खेळता एका मुलाला लागले भरपूर रडला तो आणि मग अचानक स्वतःहून उठून लागलेली जखम  स्वच्छ करण्या साठी नळाखाली गेला. हे सर्व दृश्य बघून देखील काहीच करू शकत नव्हतो. माझ्या बाळाला लागलाय म्हणून धावत पळत येवून मायेने त्या जखमेवर फुंकर घालणारी आई कोण देईल माझ्या मुलांना? कोणी बघत नाही न कोणी विचारात नाही म्हणून स्वतःउठून आपणच त्या जखमेवर फुंकर मारायची आणि परत शांत मनाने उठून इतरांच्यात सहभागी होवून खेळायचे. या मध्ये त्या बालमनावर काय आघात होत असतील किती कोमेजून जात असेल ते मन हा विचार देखील फार अस्वस्थ करून टाकतो कधी कधी.
 मला खरंच काही कळत नव्हते. संदीप फक्त त्यांच्या कडे बघत होता. वयाच्या १४व्या वर्षीच त्याने अगदी मोठ्या माणसा सारखे दाखवलेलि वागणूक मला उगाच निराशा देवून गेली. इतक्या लवकर हि  maturity. नको नको नको देवा. त्याने पण त्याचे बालपण अनुभवायला हवच. पण मी काहीच करू शकत नाही ह्या गोष्टीचे मला फार दुक्ख होते. अगदी न चुकता गाणे म्हणण्याचा आग्रह ते सर्व करतात आणि त्यांना अजिबात निराश करायचे नाही म्हणून मी अगदी ते सांगतील ते गाणे म्हणतो. पूर्ण जरी देता येत नसला तरी थोडा वेळ तरी त्यांना आनंद मिळावा, त्यांच्या रोजच्या जीवनातून काही तरी वेगळे वाटावे हीच त्या मागची भावना.
जेव्हा जेव्हा मी आश्रमात जातो मला तीच निराशा घेरून टाकते. मन अगदी सुन्न होते. त्यांची सहानभूती वाटून घेण्याखेरीज त्यांच्या सोबत चांगला वेळ घालवण्या खेरिज माझ्या हातात तरी काय आहे? मी काय करू जेणे करून ह्या मुलांना मध्ये हि अशी भावना कधीच तयार नाही होणार. फक्त देण्याघेण्या खेरीज मी आज पर्यंत त्यांच्या साठी काहीच केले नाही. उत्तरं शोधण्याचा खूप प्रयत्न करत आहे पण अजूनही काही मिळत नाही. त्याच निराशेवर मग काही तरी अशेच किरण मी शोधतो आणि माझ्याच मनाची मी समजूत घालतो. जे होते ते चांगल्या साठीच होते.
बाळानो तुम्ही खूप गुणी आणि समजूतदार आहात. तुम्हाला खूप मोठा व्हायचं आहे कारण तुम्ही खूप वेगळे अहात. अनाथ म्हणून नाही तर तुम्हाला देवाने फार लहान वयात कणखर बनवल आहे. सतत देवाचे आभार माना. कारण त्याच्या मुळेच आपण सर्वजण हे विश्व बघत आहोत. कुठली कसली हि अडचण आली तरी मी, नंदू दादा, संदीप दादा आम्ही सर्व आहोत. आम्ही कायम तुमच्या सोबत आहोत. तुम्हाला खूप मोठा व्हायायचं आहे आणि आम्ही तिघेही तो दिवस बघणार आहोत. आम्ही तुमच्या साठी स्वप्न पाहत आहोत अगदी आई वडिलांप्रमाणे. आम्ही आहोत फक्त हाक मारा. असा आधार देण्या खेरीज मी दुसरे काहीच करू शकलो नाही.…… कदाचित ह्या मधूनच त्यांना जगण्याचे नवे बळ, नवे पंख फुटतील आणि उंच अश्या ह्या आकाशात माझी हि मुले खूप मोठी भरारी घेतील.

क्षितीज
२० मे २०१३

Sunday, 23 December 2012

स्पर्श-एक संवेदना

मनुष्याच्या स्वभावाचा एक छान गुण असा कि तो कोणत्या ना कोणत्या तरी influence खाली सतत विचार करत असतो. Influence कोणताही असेल जसे कि एखाद्या कडून झालेला अपमान किवा एखाद्याने केलेली स्तुती किवा कोणताहि एखादा प्रसंग. Influence जितका जास्त तितका विचार करण्याचा कालावधी सुद्धा जास्त. Influence चा  positive effect आपण करून घेतला तर आयुष्य जगण्याचे मूळ उत्तर आपल्याला सापडू शकते. अश्याच Influence खाली असेल कदचित, माझ्या डोक्यात क्षितीज ची कल्पना आली. नंदू हितेश आणि संदीप ह्या मित्रांना घेवून ती सध्या  implement करत आहोत. ह्या सर्व influence चा मूळ शोधण्याचा मी प्रयत्न केला आणि साहजिकच मला उत्तर लगेचच मिळाल. माझ्या England Trip ने मला खूप काही दिले. त्यातीलच एक म्हणजे movie Patch Adams. ह्या movie ने मला बरेच काही शिकवलं आणि महत्वाचे म्हणजे मला माझ्या आयुष्यातून काय हवे आहे ह्या प्रश्नाचे उत्तर मला मिळाले. असंच निरर्थक, कोणतेही ध्येय न ठेवता आपण सर्वजण आला दिवस पुढे ढकलत जातो. ध्येय या शब्दाचा अर्थ प्रत्येक माणसाच्या स्वभाव प्रमाणे बदलत जाईल कदाचित. दररोज झोपताना तरी आपण हा विचार करतो का कि मला आज काय शिकायला मिळालं? आज मी का म्हणून दुखीः होतो? एवढा दुखीः राहायची गरज होती का? जर नव्हती तर मग उगाचच मी माझ्या आयुष्यातील सुंदर दिवस असाच वाया का घालवला atleat उद्या तरी असे नको व्हायला. आणि जर खरोखरच दुखीः होण्या सारखे काही कारण असेल तर त्या समस्येवर मी काय तोडगा काढला? का नुसतं दुखीः होवून वेळ वाया घालवला. हि अशी उत्तरे शोधली कि मग आपणास पुढच्या वेळेस असाच किंवा दुसरा कसला हि प्रसंग आला तर आपण त्याला धीराने सामोरे जावू शकतो.
सरस्वती आश्रम मध्ये जावून तिथे वेळ घालवणे मला खूप आवडते. तिथली मुलं, वातावरण या सर्वांशी एकंदरीतच माझं नात निर्माण झालाय.  तिथे जावून ह्या मुलांचे काय प्रश्न असतील, त्यांचे विश्व कसे आहे? आई वडील ह्या त्यांचा कल्पना काय आहेत? ह्या व अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे आम्ही सध्या मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत. हि सर्व मुले एक संवेदनशील असा उत्तम माणूस म्हणून घडावीत हाच एक प्रयास ह्यातून आम्हाला करायचा आहे. ह्या सर्वात कितपत यश येते हे आम्हास पण माहित नाही मात्र प्रयत्नात आम्ही कुठे कमी पडणार नाही.
Software Engineer आणि Google ह्यांचे नातेच वेगळे आहे. असंच एक दिवस google करत असताना अजून एका आश्रमाचे संकेतस्थळ सापडले "स्पर्श बालाग्राम". HIV बाधित मुलांचे हे अनाथालय. हे आश्रम उभे राहण्या मागे पण एक अनन्य साधारण अशी गोष्ट आहे. website वर माहिती वाचली, फोटो बघितले आणि खूप सारे प्रश्न निर्माण झाले. का? का म्हणून? एवढ्या लहान वयात ह्या मुलांचा काय अपराध म्हणून हि अशी जीवघेणी चेष्टा? माझ्या मनातील देवाच्या आसीत्वा बाबत लागलीच शंका उपस्थित झाली. सर्व काही डोके सुन्न करणारे होते. विचार आला कि एक भेट देऊन तरी बघू. पण खरं सांगायचे तर माझे धाडस होत नव्हते. ह्या साठी HIV हे कारण नक्कीच नाही. ती मुले जे दुक्ख भोगत आहेत त्यांच्या ज्या वेदना आहेत त्या मी बघूच शकणार नाही. हे सर्व माझ्या आणि आपण सर्वांच्या कल्पने पलीकडचे आहे. असे का? पुन्हा पुन्हा मीच मलाच निर्रुतर प्रश्न विचारत होतो. डोके फुटायची वेळ आली. मी सरळ website बंद केली आणि एक मग कॉफी घेतली. पळवाट असेल कदाचित. एक मग कॉफी ने मी हे सर्व विचार दूर करू पाहत होतो पण प्रत्यक्षात मात्र हि मुले हे आयुष्य जगत आहेत. अंगावर शहारे येत होते काही केल्या विचार चक्र थांबायला तयार होईना. शेवटी नंदू चा आधार घेतला. नंदू जवळ जेव्हा मोकळा झालो तेव्हा हे सर्व ऐकून तो निर्रुतरीत आणि सुन्न झाला. आम्हास खरच कळत नव्हते कि काय करावे. शेवटी ठरवलेच आम्ही कि जावू एक दिवस जर काही नाही जमलं तर atleast छान सुंदर अश्या गप्पा तर नक्कीच मारू शकतो आपण ह्या मुलांसोबत. पण दुसरे मन ऐकायला तयार नव्हते. संदीप शी बोलणे झाले त्याला पण काय बोलावे हेच सुचत नव्हते. हितेश ऑफिस च्या कामात खूप व्यस्त होता म्हणून त्याला हे सर्व सांगून त्याच्या पुढे अजून नवे प्रश्न आम्हाला उभे करायचे नव्हते. खूप ठरवूनहि आमचे काही केल्या धाडस होत नव्हते.
सरतेशेवटी तो गुरवार होता. Sandy टपरी वर भेटला आणि तिथेच decide केले कि आज संध्याकाळी काही केल्या जायचेच. ऑफिस workload संपवून आम्ही पत्ता शोधत एकदाचे स्पर्श बालग्राम ला पोहचलो. फुल मस्ती करत, गाणी म्हणत आलेलो आम्ही पार्किंग मध्ये आल्यावर एकदम mute झालो. का ते माहित नाही. एक शांत वाऱ्याची लाट आणि बोचरी थंडी घेत आम्ही दारावरची बेल वाजवली. स्पर्श बालग्राम १ bhk flat मध्ये चालवला जातो. घड्याळ बघितले तर ८.३० वाजले होते. तरी देखील अगदी प्रसन्न मुद्रेने सौ. सुजाता ताईनि दार उघडले. आतील दृश्य बघून छान वाटले सर्व मुले पंगत करून जेवायला बसली होती. आणलेले sweets सुजाता ताई कडे देवून आम्ही श्री महेश दादा ह्यांच्या सोबत चर्चा करू लागलो. मला का कोणास ठावूक खूप खूप उदास वाटत होते. कदाचित माझे मन अजूनही हि गोष्ट ऐकायला तयार नव्हते कि हि सर्व मुले HIV ग्रस्त आहेत. संदीप तर एक शब्द देखील बोलायला तयार नव्हता.  तो पूर्ण वेळ एक शब्द देखील बोलला नाही. आम्ही दोघे असे गप्प असलेले पाहून शेवटी श्री. महेश ह्यांनीच विषयास हात घातला आणि विचारले कि कसे काय येणे केले आज? महेश दादा सोबत बरीच चर्चा केली. दादा कडून बरीच माहिती मिळाली त्यांना आश्रम चालवताना येणाऱ्या अडचणींची देखील माहिती मिळाली. स्पर्श बालग्राम चा stall देखील असतो हे सुद्धा कळले. मी हळूच एक नजर मुलांकडे टाकली खूप सुंदर आणि निरागस अशी हि मुले आहेत. ह्या मधील काही मुलांचे आई वडील दोघेहि हयात नाही तर काही जणांचे अगदी शेवटच्या stage मध्ये मरणाची वाट बघत यातना भोगत आहेत. अगदी प्रामाणिकपणे वारसा हक्क ईश्वराने ह्या मुलांना दिलाय. सर्व च्या सर्व मुलांना त्यांच्या आई वडिलान कडून ह्या रोगाची लागण झालीये. देवा अगाध तुझी महिमा रे. एकीकडे वारसा हक्क वरून वैर निर्माण करतोस तर एकीकडे ह्या अश्या चिमुरड्यांना हि असली भयानक शिक्षा देतोस. त्यांचा काय अपराध रे?  ह्यातील जवळ पास सर्व मुलांना हा आजार काय ते सुद्धा माहित नाही. तर काहीना हे देखील माहित नाही कि आपण ह्या असल्या भयानक आजाराने ग्रस्त आहोत. पण महेश दादा आणि सुजाता  ताई त्यांची खूप काळजी घेतात. केवढे मोठे हे काम. मी महेश दादाला विचारले देखील कि तुमचा हे सर्व करण्या मागचा उद्धेश काय? त्यांचे हे उत्तर "मला ह्या मुलांचे जीवन सुंदर बनवायचे आहे आणि त्यांना एक उत्तम नागरिक बनवून स्व बळावर उभे करायचे आहे." Wow मला हे सर्व Dr. Patch च्या उद्दिष्टाशी मिळते जुळते वाटले. सहीच. शेवटी महेश ला सुद्धा ह्या प्रश्नाचे उत्तर मिळालेच कि त्यांना त्यांच्या आयुष्यातून काय हवे आहे. आयुष्य जगताना संवेदना हीन अश्या मनाने किती हि पैसा मिळवला तरी काय फायदा सरते शेवटी तो सरणावर थोडीच जाणार आहे. सर्व काही सोडून आपणच तिथे एकटे पडलेलो असू. हि उत्तम शिकवण मला महेशदादा नि शिकवली.
       आयुष्य जगताना सामजिक बांधिलकी ठेवून, मरण शय्ये वर उभ्या असणाऱ्या कोवळ्या जीवांचा विचार करून त्यांच्या साठी सतत झटणाऱ्या त्यांच्या साठीच आपले जीवन अर्पण करणाऱ्या आणि सतत हसतमुख असणाऱ्या माझ्या महेश दादा आणि सुजाता ताईना मानाचा सलाम.
                     
क्षितीज
२३ डिसें २०१२

















Monday, 12 November 2012

विश्व ... कल्पने पलीकडचे

मनातील आग कधी कशी आणि का पेटेल ते काही सांगता येत नाही. असाच एक विचार बऱ्याच दिवसां पासून मनात सारखा घर करत होता. mail आला होता मला एक दिवस आनंदवन बद्दल. वाचून आदरणीय बाबा आमटे ह्यांच्या बद्दल खूप आदर निर्माण झाला. पण त्याच सोबत अजून एक विचार मनात चालू झाला अनाथ मुलां चे काय विश्व असेल. आपल्या सर्वांच्या कल्पने पलीकडचे हे विश्व आहे. मनात प्रचंड घालमेल चालू झाली. मग असेच google करताना एक आश्रमाची website सापडली नाव होते सरस्वती अनाथ आश्रम. हि site जवळपास १०० वेळा तरी बघितली असेल. त्या वरील फोटो बघून खूप feel झाले. ठरवले मनात कधी तरी भेट देवूच ह्या आश्रमाला पण योग काही येत नव्हता. असाच नंदू सोबत बसलो होतो एक दिवस. बोलता बोलता सहज म्हटले नंदू अरे आज जागतिक मातृदिन आहे रे. आणि इथेच एक अनाथ आश्रम आहे जायचे का ? जिथे विचार जुळतात कुठलेच expectation राहत नाही यालाच मैत्री असा म्हणावे कदाचित. म्हणूच कि काय नंदू ने विचार लगेचच उचलून धरला. तो दिवस अविस्मरणीय होता. फक्त १ तासच घालवला आम्ही तिथे पण तो हि खूप काही  गेला देवून आम्हाला. समीकरण एकदम सोपे होते. कोण आहे ह्या मुलांना आपले असे म्हणणारे. एक आश्रम चालक सोडले तर कोणीच नाही. पण आश्रम चालकान वर पण कदाचित काही मर्यादा येत असतीलच ना. मुले खूप छान  बोलली आमच्या सोबत. खूप सारे manners त्यांना आहेत. त्या दिवशी आल्या पासून मन शांत बसायला तयारच नव्हते. काही केल्या सैरभैर झालेले माझे मन माझ्याच काबूत का येत नव्हते ते मला देखील कळत नव्हते. सरते शेवटी दिलीच करून वाट मोकळी मी अश्रुना. मनातील भार हलका करण्याचा तो एक उत्तम उपाय आहे. बऱ्याच वेळाने जरा हलके हलके वाटले. सरते शेवटी सर्व काही विसरून जायचे ठरवले आणि जसे जमेल तसे आपण येथे जात राहू असे ठरविले. गेला तो दिवस अन मग परत चालू झाले daily routine. आला एक दिवस माझा वाढदिवस. सर्वजण करतात तसा मी पण celebrate केला. पण अजूनहि काही तरी missing आहे असे वाटत होते. मग सांगितले संदीप ला चल रे जायचे आहे आपल्याला दगडू शेठ ला. हो म्हटला तो पण लगेच. ठरवले जावू आश्रमात परत. आज मुलांसाठी काही तरी गोड खावू घेवून जावू शेवटी कोण आहे ना त्यांना. गेलो मग तिथे आणि मुलांचे ते बोल कानी पडले God bless you. हा आशीर्वाद म्हणावे कि अजून काही. काहीही असोत मला खूप छान आणि हलके हलके वाटले. तिथे मुलांसाठी tutor म्हणून काम करणाऱ्या आदरणीय गायकवाड सर ह्यांच्या सोबत जरा चर्चा केली आश्रम चालवताना काय अडचणी येतात ह्या बद्दल माहिती घेतली. संदीप ला पण आवडली ती जागा. जो तिथे जाईल त्याला हि मुले आपलेसे करून घेतात काय जादू आहे काय माहित. डोक्यात त्याच वेळी विचार पेटला काही तरी वेगळे करायचे आहे. पण कसे ते समजत नव्हते. बसलो होतो एकदा असाच ऑफिस च्या कॅन्टीन मध्ये भूक लागली म्हणून. विचारले मला सहज मित्राने झाली का रे shopping दिवाळी ची? सहज डोळ्यापुढे बालपण उभे राहिले माझ्या. किती केली मी चंगळ,धमाल मस्ती माझ्या लहानपणी. हवे तसले हवे तेवढे फटाके कपडे आणि बरेच काही. मग माझ्या ह्या मुलांना कोण देईल घेवून नवे कपडे ? कोण करेल त्यांच्या साठी हे सर्व काही. कदाचित येईल कोणी तरी घेवून नवीन कपडे. हक्काचे कोणी नाही म्हणून आशा लावून बसण्या खेरीज काय आहे त्यांच्या हातात. मनात घालमेल चालू झाली आणि सहजच ओंकार ला म्हणालो ओंक्या माझ्या डोक्यात एक विचार येत आहे सारखा. हि अशी जी अनाथ मुले असतात त्यांच्या साठी काही तरी करू रे. या दिवाळी ला कपडे घ्यायचे का त्यांना नवीन? मला एकट्याला किवा आपण दोघांना हे शक्य नाही तर मग अजून बाकीच्या मित्रांची मदत घेवू. नंदू ला लगेच एक फोन. साहेब फोन वरूनच एका पायावर तयार. असे सर्व करता करता आम्हाला २१ जण मिळाले जे ह्या कामाला sponsor करतील. आणि सर्व मुलांसाठी कपडे खरेदी झाली सुद्धा. एकदम jhang pang कपडे घेतले सर्वाना. हे सर्व करताना एक वेगळीच प्रेरणा आणि शक्ती बरोबर होती. मनात आग असेल आणि एखाद्या गोष्टी चा ध्यास घेतला कि ती गोष्ट एकदम तडीस पार पडल्या शिवाय चैन पडत नाही. सरते शेवटी कपडे मुलांना दिलेच. joy of giving ज्याला म्हणतात तो आम्ही अनुभवला. मुलांच्या डोळ्यातील आनंद आणि समाधान जे आम्ही अनुभवले त्याला शब्द नाहीत. खूप छान वाटले. ज्या जवळच्या व्यक्तीन सोबत हे share केले त्यांना पण हि कल्पना खूप आवडली.
                    म्हणूनच ठरवलंय मी, नंदू आणि ओंकार ने कि करायच काहीतरी ह्या मुलांसाठी. त्यांचे विश्व काय आहे हे जाणून घेवून  त्यांच्या विश्वातील एक कुटुंब आम्हाला तयार करायचे आहे. जिथे फक्त आणि फक्त प्रेम आणि सहकार्य असेल. म्हणूनच मग एक group तयार करावा म्हणतोय.  लवकरच अजून एक दोन नवीन initiative घेवून आम्ही आपल्याकडे येवू. गरज आहे आपल्या मदतीची आम्हास (मदत ह्याचा अर्थ फक्त आर्थिक असा होत नाही) तुमचे प्रेम खूप काही देईल त्यांना. समाजासाठी काही तरी देणे आहे आपले हि एकच भावना आम्ही तिघे बाळगून आहोत. ज्यांना आपले घर असे नाही, ज्यांना ह्या जगात मायेची फार नितांत गरज आहे आणि ज्यांना मन मोकळे करण्यासाठी कोणी नाही ह्या सर्वांसाठी आम्ही आहोत वय, जात, धर्म ह्या आणि अजून कोणत्याही मर्यादे पलीकडे. हो नक्कीच. कधीहि कुठेहि आणि केव्हाहि.