मनुष्याच्या स्वभावाचा एक छान गुण असा कि तो कोणत्या ना कोणत्या तरी influence खाली सतत विचार करत असतो. Influence कोणताही असेल जसे कि एखाद्या कडून झालेला अपमान किवा एखाद्याने केलेली स्तुती किवा कोणताहि एखादा प्रसंग. Influence जितका जास्त तितका विचार करण्याचा कालावधी सुद्धा जास्त. Influence चा positive effect आपण करून घेतला तर आयुष्य जगण्याचे मूळ उत्तर आपल्याला सापडू शकते. अश्याच Influence खाली असेल कदचित, माझ्या डोक्यात क्षितीज ची कल्पना आली. नंदू हितेश आणि संदीप ह्या मित्रांना घेवून ती सध्या implement करत आहोत. ह्या सर्व influence चा मूळ शोधण्याचा मी प्रयत्न केला आणि साहजिकच मला उत्तर लगेचच मिळाल. माझ्या England Trip ने मला खूप काही दिले. त्यातीलच एक म्हणजे movie Patch Adams. ह्या movie ने मला बरेच काही शिकवलं आणि महत्वाचे म्हणजे मला माझ्या आयुष्यातून काय हवे आहे ह्या प्रश्नाचे उत्तर मला मिळाले. असंच निरर्थक, कोणतेही ध्येय न ठेवता आपण सर्वजण आला दिवस पुढे ढकलत जातो. ध्येय या शब्दाचा अर्थ प्रत्येक माणसाच्या स्वभाव प्रमाणे बदलत जाईल कदाचित. दररोज झोपताना तरी आपण हा विचार करतो का कि मला आज काय शिकायला मिळालं? आज मी का म्हणून दुखीः होतो? एवढा दुखीः राहायची गरज होती का? जर नव्हती तर मग उगाचच मी माझ्या आयुष्यातील सुंदर दिवस असाच वाया का घालवला atleat उद्या तरी असे नको व्हायला. आणि जर खरोखरच दुखीः होण्या सारखे काही कारण असेल तर त्या समस्येवर मी काय तोडगा काढला? का नुसतं दुखीः होवून वेळ वाया घालवला. हि अशी उत्तरे शोधली कि मग आपणास पुढच्या वेळेस असाच किंवा दुसरा कसला हि प्रसंग आला तर आपण त्याला धीराने सामोरे जावू शकतो.
सरस्वती आश्रम मध्ये जावून तिथे वेळ घालवणे मला खूप आवडते. तिथली मुलं, वातावरण या सर्वांशी एकंदरीतच माझं नात निर्माण झालाय. तिथे जावून ह्या मुलांचे काय प्रश्न असतील, त्यांचे विश्व कसे आहे? आई वडील ह्या त्यांचा कल्पना काय आहेत? ह्या व अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे आम्ही सध्या मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत. हि सर्व मुले एक संवेदनशील असा उत्तम माणूस म्हणून घडावीत हाच एक प्रयास ह्यातून आम्हाला करायचा आहे. ह्या सर्वात कितपत यश येते हे आम्हास पण माहित नाही मात्र प्रयत्नात आम्ही कुठे कमी पडणार नाही.
Software Engineer आणि Google ह्यांचे नातेच वेगळे आहे. असंच एक दिवस google करत असताना अजून एका आश्रमाचे संकेतस्थळ सापडले "स्पर्श बालाग्राम". HIV बाधित मुलांचे हे अनाथालय. हे आश्रम उभे राहण्या मागे पण एक अनन्य साधारण अशी गोष्ट आहे. website वर माहिती वाचली, फोटो बघितले आणि खूप सारे प्रश्न निर्माण झाले. का? का म्हणून? एवढ्या लहान वयात ह्या मुलांचा काय अपराध म्हणून हि अशी जीवघेणी चेष्टा? माझ्या मनातील देवाच्या आसीत्वा बाबत लागलीच शंका उपस्थित झाली. सर्व काही डोके सुन्न करणारे होते. विचार आला कि एक भेट देऊन तरी बघू. पण खरं सांगायचे तर माझे धाडस होत नव्हते. ह्या साठी HIV हे कारण नक्कीच नाही. ती मुले जे दुक्ख भोगत आहेत त्यांच्या ज्या वेदना आहेत त्या मी बघूच शकणार नाही. हे सर्व माझ्या आणि आपण सर्वांच्या कल्पने पलीकडचे आहे. असे का? पुन्हा पुन्हा मीच मलाच निर्रुतर प्रश्न विचारत होतो. डोके फुटायची वेळ आली. मी सरळ website बंद केली आणि एक मग कॉफी घेतली. पळवाट असेल कदाचित. एक मग कॉफी ने मी हे सर्व विचार दूर करू पाहत होतो पण प्रत्यक्षात मात्र हि मुले हे आयुष्य जगत आहेत. अंगावर शहारे येत होते काही केल्या विचार चक्र थांबायला तयार होईना. शेवटी नंदू चा आधार घेतला. नंदू जवळ जेव्हा मोकळा झालो तेव्हा हे सर्व ऐकून तो निर्रुतरीत आणि सुन्न झाला. आम्हास खरच कळत नव्हते कि काय करावे. शेवटी ठरवलेच आम्ही कि जावू एक दिवस जर काही नाही जमलं तर atleast छान सुंदर अश्या गप्पा तर नक्कीच मारू शकतो आपण ह्या मुलांसोबत. पण दुसरे मन ऐकायला तयार नव्हते. संदीप शी बोलणे झाले त्याला पण काय बोलावे हेच सुचत नव्हते. हितेश ऑफिस च्या कामात खूप व्यस्त होता म्हणून त्याला हे सर्व सांगून त्याच्या पुढे अजून नवे प्रश्न आम्हाला उभे करायचे नव्हते. खूप ठरवूनहि आमचे काही केल्या धाडस होत नव्हते.
सरतेशेवटी तो गुरवार होता. Sandy टपरी वर भेटला आणि तिथेच decide केले कि आज संध्याकाळी काही केल्या जायचेच. ऑफिस workload संपवून आम्ही पत्ता शोधत एकदाचे स्पर्श बालग्राम ला पोहचलो. फुल मस्ती करत, गाणी म्हणत आलेलो आम्ही पार्किंग मध्ये आल्यावर एकदम mute झालो. का ते माहित नाही. एक शांत वाऱ्याची लाट आणि बोचरी थंडी घेत आम्ही दारावरची बेल वाजवली. स्पर्श बालग्राम १ bhk flat मध्ये चालवला जातो. घड्याळ बघितले तर ८.३० वाजले होते. तरी देखील अगदी प्रसन्न मुद्रेने सौ. सुजाता ताईनि दार उघडले. आतील दृश्य बघून छान वाटले सर्व मुले पंगत करून जेवायला बसली होती. आणलेले sweets सुजाता ताई कडे देवून आम्ही श्री महेश दादा ह्यांच्या सोबत चर्चा करू लागलो. मला का कोणास ठावूक खूप खूप उदास वाटत होते. कदाचित माझे मन अजूनही हि गोष्ट ऐकायला तयार नव्हते कि हि सर्व मुले HIV ग्रस्त आहेत. संदीप तर एक शब्द देखील बोलायला तयार नव्हता. तो पूर्ण वेळ एक शब्द देखील बोलला नाही. आम्ही दोघे असे गप्प असलेले पाहून शेवटी श्री. महेश ह्यांनीच विषयास हात घातला आणि विचारले कि कसे काय येणे केले आज? महेश दादा सोबत बरीच चर्चा केली. दादा कडून बरीच माहिती मिळाली त्यांना आश्रम चालवताना येणाऱ्या अडचणींची देखील माहिती मिळाली. स्पर्श बालग्राम चा stall देखील असतो हे सुद्धा कळले. मी हळूच एक नजर मुलांकडे टाकली खूप सुंदर आणि निरागस अशी हि मुले आहेत. ह्या मधील काही मुलांचे आई वडील दोघेहि हयात नाही तर काही जणांचे अगदी शेवटच्या stage मध्ये मरणाची वाट बघत यातना भोगत आहेत. अगदी प्रामाणिकपणे वारसा हक्क ईश्वराने ह्या मुलांना दिलाय. सर्व च्या सर्व मुलांना त्यांच्या आई वडिलान कडून ह्या रोगाची लागण झालीये. देवा अगाध तुझी महिमा रे. एकीकडे वारसा हक्क वरून वैर निर्माण करतोस तर एकीकडे ह्या अश्या चिमुरड्यांना हि असली भयानक शिक्षा देतोस. त्यांचा काय अपराध रे? ह्यातील जवळ पास सर्व मुलांना हा आजार काय ते सुद्धा माहित नाही. तर काहीना हे देखील माहित नाही कि आपण ह्या असल्या भयानक आजाराने ग्रस्त आहोत. पण महेश दादा आणि सुजाता ताई त्यांची खूप काळजी घेतात. केवढे मोठे हे काम. मी महेश दादाला विचारले देखील कि तुमचा हे सर्व करण्या मागचा उद्धेश काय? त्यांचे हे उत्तर "मला ह्या मुलांचे जीवन सुंदर बनवायचे आहे आणि त्यांना एक उत्तम नागरिक बनवून स्व बळावर उभे करायचे आहे." Wow मला हे सर्व Dr. Patch च्या उद्दिष्टाशी मिळते जुळते वाटले. सहीच. शेवटी महेश ला सुद्धा ह्या प्रश्नाचे उत्तर मिळालेच कि त्यांना त्यांच्या आयुष्यातून काय हवे आहे. आयुष्य जगताना संवेदना हीन अश्या मनाने किती हि पैसा मिळवला तरी काय फायदा सरते शेवटी तो सरणावर थोडीच जाणार आहे. सर्व काही सोडून आपणच तिथे एकटे पडलेलो असू. हि उत्तम शिकवण मला महेशदादा नि शिकवली.
आयुष्य जगताना सामजिक बांधिलकी ठेवून, मरण शय्ये वर उभ्या असणाऱ्या कोवळ्या जीवांचा विचार करून त्यांच्या साठी सतत झटणाऱ्या त्यांच्या साठीच आपले जीवन अर्पण करणाऱ्या आणि सतत हसतमुख असणाऱ्या माझ्या महेश दादा आणि सुजाता ताईना मानाचा सलाम.
क्षितीज
२३ डिसें २०१२
Sunday, 23 December 2012
Monday, 12 November 2012
विश्व ... कल्पने पलीकडचे
मनातील आग कधी कशी आणि का पेटेल ते काही सांगता येत नाही. असाच एक विचार बऱ्याच दिवसां पासून मनात सारखा घर करत होता. mail आला होता मला एक दिवस आनंदवन बद्दल. वाचून आदरणीय बाबा आमटे ह्यांच्या बद्दल खूप आदर निर्माण झाला. पण त्याच सोबत अजून एक विचार मनात चालू झाला अनाथ मुलां चे काय विश्व असेल. आपल्या सर्वांच्या कल्पने पलीकडचे हे विश्व आहे. मनात प्रचंड घालमेल चालू झाली. मग असेच google करताना एक आश्रमाची website सापडली नाव होते सरस्वती अनाथ आश्रम. हि site जवळपास १०० वेळा तरी बघितली असेल. त्या वरील फोटो बघून खूप feel झाले. ठरवले मनात कधी तरी भेट देवूच ह्या आश्रमाला पण योग काही येत नव्हता. असाच नंदू सोबत बसलो होतो एक दिवस. बोलता बोलता सहज म्हटले नंदू अरे आज जागतिक मातृदिन आहे रे. आणि इथेच एक अनाथ आश्रम आहे जायचे का ? जिथे विचार जुळतात कुठलेच expectation राहत नाही यालाच मैत्री असा म्हणावे कदाचित. म्हणूच कि काय नंदू ने विचार लगेचच उचलून धरला. तो दिवस अविस्मरणीय होता. फक्त १ तासच घालवला आम्ही तिथे पण तो हि खूप काही गेला देवून आम्हाला. समीकरण एकदम सोपे होते. कोण आहे ह्या मुलांना आपले असे म्हणणारे. एक आश्रम चालक सोडले तर कोणीच नाही. पण आश्रम चालकान वर पण कदाचित काही मर्यादा येत असतीलच ना. मुले खूप छान बोलली आमच्या सोबत. खूप सारे manners त्यांना आहेत. त्या दिवशी आल्या पासून मन शांत बसायला तयारच नव्हते. काही केल्या सैरभैर झालेले माझे मन माझ्याच काबूत का येत नव्हते ते मला देखील कळत नव्हते. सरते शेवटी दिलीच करून वाट मोकळी मी अश्रुना. मनातील भार हलका करण्याचा तो एक उत्तम उपाय आहे. बऱ्याच वेळाने जरा हलके हलके वाटले. सरते शेवटी सर्व काही विसरून जायचे ठरवले आणि जसे जमेल तसे आपण येथे जात राहू असे ठरविले. गेला तो दिवस अन मग परत चालू झाले daily routine. आला एक दिवस माझा वाढदिवस. सर्वजण करतात तसा मी पण celebrate केला. पण अजूनहि काही तरी missing आहे असे वाटत होते. मग सांगितले संदीप ला चल रे जायचे आहे आपल्याला दगडू शेठ ला. हो म्हटला तो पण लगेच. ठरवले जावू आश्रमात परत. आज मुलांसाठी काही तरी गोड खावू घेवून जावू शेवटी कोण आहे ना त्यांना. गेलो मग तिथे आणि मुलांचे ते बोल कानी पडले God bless you. हा आशीर्वाद म्हणावे कि अजून काही. काहीही असोत मला खूप छान आणि हलके हलके वाटले. तिथे मुलांसाठी tutor म्हणून काम करणाऱ्या आदरणीय गायकवाड सर ह्यांच्या सोबत जरा चर्चा केली आश्रम चालवताना काय अडचणी येतात ह्या बद्दल माहिती घेतली. संदीप ला पण आवडली ती जागा. जो तिथे जाईल त्याला हि मुले आपलेसे करून घेतात काय जादू आहे काय माहित. डोक्यात त्याच वेळी विचार पेटला काही तरी वेगळे करायचे आहे. पण कसे ते समजत नव्हते. बसलो होतो एकदा असाच ऑफिस च्या कॅन्टीन मध्ये भूक लागली म्हणून. विचारले मला सहज मित्राने झाली का रे shopping दिवाळी ची? सहज डोळ्यापुढे बालपण उभे राहिले माझ्या. किती केली मी चंगळ,धमाल मस्ती माझ्या लहानपणी. हवे तसले हवे तेवढे फटाके कपडे आणि बरेच काही. मग माझ्या ह्या मुलांना कोण देईल घेवून नवे कपडे ? कोण करेल त्यांच्या साठी हे सर्व काही. कदाचित येईल कोणी तरी घेवून नवीन कपडे. हक्काचे कोणी नाही म्हणून आशा लावून बसण्या खेरीज काय आहे त्यांच्या हातात. मनात घालमेल चालू झाली आणि सहजच ओंकार ला म्हणालो ओंक्या माझ्या डोक्यात एक विचार येत आहे सारखा. हि अशी जी अनाथ मुले असतात त्यांच्या साठी काही तरी करू रे. या दिवाळी ला कपडे घ्यायचे का त्यांना नवीन? मला एकट्याला किवा आपण दोघांना हे शक्य नाही तर मग अजून बाकीच्या मित्रांची मदत घेवू. नंदू ला लगेच एक फोन. साहेब फोन वरूनच एका पायावर तयार. असे सर्व करता करता आम्हाला २१ जण मिळाले जे ह्या कामाला sponsor करतील. आणि सर्व मुलांसाठी कपडे खरेदी झाली सुद्धा. एकदम jhang pang कपडे घेतले सर्वाना. हे सर्व करताना एक वेगळीच प्रेरणा आणि शक्ती बरोबर होती. मनात आग असेल आणि एखाद्या गोष्टी चा ध्यास घेतला कि ती गोष्ट एकदम तडीस पार पडल्या शिवाय चैन पडत नाही. सरते शेवटी कपडे मुलांना दिलेच. joy of giving ज्याला म्हणतात तो आम्ही अनुभवला. मुलांच्या डोळ्यातील आनंद आणि समाधान जे आम्ही अनुभवले त्याला शब्द नाहीत. खूप छान वाटले. ज्या जवळच्या व्यक्तीन सोबत हे share केले त्यांना पण हि कल्पना खूप आवडली.
म्हणूनच ठरवलंय मी, नंदू आणि ओंकार ने कि करायच काहीतरी ह्या मुलांसाठी. त्यांचे विश्व काय आहे हे जाणून घेवून त्यांच्या विश्वातील एक कुटुंब आम्हाला तयार करायचे आहे. जिथे फक्त आणि फक्त प्रेम आणि सहकार्य असेल. म्हणूनच मग एक group तयार करावा म्हणतोय. लवकरच अजून एक दोन नवीन initiative घेवून आम्ही आपल्याकडे येवू. गरज आहे आपल्या मदतीची आम्हास (मदत ह्याचा अर्थ फक्त आर्थिक असा होत नाही) तुमचे प्रेम खूप काही देईल त्यांना. समाजासाठी काही तरी देणे आहे आपले हि एकच भावना आम्ही तिघे बाळगून आहोत. ज्यांना आपले घर असे नाही, ज्यांना ह्या जगात मायेची फार नितांत गरज आहे आणि ज्यांना मन मोकळे करण्यासाठी कोणी नाही ह्या सर्वांसाठी आम्ही आहोत वय, जात, धर्म ह्या आणि अजून कोणत्याही मर्यादे पलीकडे. हो नक्कीच. कधीहि कुठेहि आणि केव्हाहि.
Subscribe to:
Posts (Atom)
